Shravan 2023 : पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पुण्याच्या भीमाशंकर मंदिरात भक्तांची मांदियाळी, मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज श्रावणातला पहिला सोमवार. यानिमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे.
मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा करुन भीमाशंकरचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.
मंदिराला तसेच शिवलिंगाला आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आलं आहे.
एरव्ही मंदिरातील मुख्य शिवलिंगावर चांदीच्या शिवलिंगाचे आवरण असते. मात्र, श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मुख्य शिवलिंगाचे दर्शन एब पी माझाच्या प्रेक्षकांना होतंय.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर शिवमंदिर हे अतिशय दुर्गम अशा डोंगरामधे वसलंय.
इथपर्यंत जाणारा रस्ता मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यांनी नेहमीच व्यापलेला असतो. यामुळे भीमाशंकरला महाराष्ट्राच केदारनाथ देखील म्हटलं जांत.
या परिसराचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीमाशंकर मंदिरास भेट द्यावी अशी मागणी भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त मधुकर गावंदेंनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलीय.