Sawan Somwar: श्रावणी सोमवारच्या निमित्ताने करा या गोष्टींचं दान; शंकराची होईल कृपा
शंकराचा आशीर्वाद मिळावा म्हणून श्रावण महिन्यात विशेष पूजा केली जाते. शिवशंकराच्या पूजेप्रमाणेच श्रावणात दानाला देखील तितकंच महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशास्त्रात सांगितल्यानुसार, श्रावण महिन्यात पूजा आणि दान केल्याने सर्व पाप दूर होतात आणि इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात. तर आज जाणून घेऊया श्रावणी सोमवारच्या दिवशी कोणत्या वस्तूंचं दान करणं लाभदायक ठरेल.
काळे तीळ: श्रावण महिन्यात शंकराला जलाभिषेक करताना त्यात काळ्या तिळाचा वापर केला जातो. काळे तीळ शंकर आणि शनि देव दोघांनाही आवडतात. ज्यांच्या ग्रहांमध्ये दोष आहेत त्यांनी श्रावणी सोमवर किंवा श्रावणी शनिवारच्या दिवशी काळ्या तिळाचं दान केलं पाहिजे. या उपायामुळे ग्रह दोष दूर होतो.
मीठ: वास्तु शास्त्रानुसार, मिठाचा वापर केल्याने घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते. श्रावणाच्या महिन्यात जे लोक मिठाचं दान करतात, त्यांचे सर्व दु:ख दूर होते. मिठाच्या वापराने घरात सुख-समृद्धी देखील नांदते.
तांदूळ: श्रावणाच्या पहिल्या सोमवारी गरिबांना तांदूळ दान केले पाहिजे. तुम्ही तांदळाची खीर देखीन दान करू शकता, त्यामुळे जीवनात यश मिळेल.
रुद्राक्ष: रुद्राक्षला शंकर देवाचं विशेष आभूषण मानलं जातं. शास्त्रात रुद्राक्षला शिव शंकराचा अंक्ष मानलं जातं. रुद्राक्षचा निर्माण शंकराच्या अश्रूंतून झाल्याची मान्यता आहे. त्यामुळे जे लोक श्रावणाच्या महिन्यात रुद्राक्षाचं दान करतात, त्यांना दीर्घायुष्य लाभतं आणि लवकर मृत्यू येत नाही.
चांदी: ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्यांनी यातून मुक्ति मिळवण्यासाठी श्रावणाच्या महिन्यात चांदीच्या वस्तूंचं दान केलं पाहिजे, असं करणं फार शुभ मानलं जातं. श्रावणाच्या महिन्यात पुत्र प्राप्तासाठी देखील चांदीचं दान केलं पाहिजे.