Ram Mandir Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या राम मंदिरात दाखल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचं छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले. प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याच्या विधी सुरू झाल्या आहेत(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकुर्ता अन् धोतर; प्रभू श्रीराम अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधानांचा खास पेहराव(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिरात पोहोचले आहेत. कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव पंतप्रधानांनी केला आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
पंतप्रधान मोदी श्रीराम मंदिरात दाखल झाले असून थोड्याच वेळात प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात होणार आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
प्रभू श्रीरामाची तेजस्वी मूर्ती तयार करणारे शिल्पकार अरुण योगीराजही अयोध्येत भव्य अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आहेत(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
योध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांची विधीवत प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भव्य मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.(Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
साध्वी ऋतंभरा आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांची राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भेट झाली. त्यावेळी दोघीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दोघांनी एकमेकींची गळाभेट घेतली. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात पोहोचले आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. सध्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्रभू श्रीरामाच्या अभिषेकसोहळ्याला सुरुवात होईल. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
सरसंघचालक मोहन भागवत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)