Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा निमित्त, मंदिरात फुलांची आरास!
आज वसंत पंचमी दिवशी विठुराया आणि रुक्मिणीमातेचा विवाह सोहळा.. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोहळ्या निमित्त गाभाऱ्यात व संपूर्ण मंदिरात फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
पंढरपुरात माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी दिवशी विठुरायाच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने विठुराया आणि रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडणार. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
सकाळपासूनच या आगळ्या वेगळ्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
आजच्या विवाहसोहळ्यासाठी साक्षात विठुराया आणि रुक्मिणीमातेसाठी पांढरा शुभ्र पोशाख बनवण्यात आला आहे . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
यावर्षी विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि सीता यांचे आकर्षक चित्र दोरे कामात रेखाटण्यात आले आहे . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
या विवाहानिमित्त विठ्ठल रुक्मिणीची पारंपारिक पद्धतीने षोडशोपचारे पूजा करण्यात आली . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
यावेळी विठूरायाला शुभ्र पांढऱ्या वस्त्रात सजविण्यात आले होते , मस्तकावर पांढरी पगडी , अंगात जरीकाठी रेशमी अंगी , कमरेला पंधरा शेला आणि पांढरे धोतर या पोषाखातील नवरदेवाला विविध फुलांच्या माळा घालण्यात आल्या आहेत . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
वधू रुक्मिणी माता देखील पांढऱ्या रंगाच्या पैठणीत सजली आहे डोक्यावर सोन्याचा मुकुट , गळ्यात फुलांच्या दागिन्यात रुक्मिणी मातेचे रूप उठून दिसत आहे . (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)
वधू वरांच्या अंगावर केशर पाणी व गुलाल शिंपडून लग्नाला सज्ज करण्यात आले आहे. (Photo Credit : Twitter/@PandharpurVR)