Shravani Somvar : पहिल्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ नगरीत भक्तांचा महापूर

आज पहिला श्रावणी सोमवार. त्या निमित्ताने आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात रात्रीपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हेमाडपंथी असलेल्या या नागनाथ मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी दर्शनासाठी येत आसतात

मध्यरात्री संस्थांचे अध्यक्ष तहसीलदार विठ्ठल परळीकर यांचा हस्ते प्रशासकीय पूजा झाल्यानंतर मंदिरात भक्तांना दर्शनासाठी परवानगी दिली जाते
रात्रीपासून भक्तांचा महापूर हा ठिकाणी पाहायला मिळतो आहे.
श्रावणी सोमवारी नागनाथाचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भक्त मंडळी नागनाथाला दुग्धाभिशेख सुद्धा घालतात.
या श्रावणी सोमवारी महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा भक्तमंडळी दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचं इथलं मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगितलं जातं.