Devi Lakshmi : आर्थिक तंगीने त्रस्त असाल, तर शुक्रवारी रात्री लक्ष्मी देवीचा 'हा' अवश्य उपाय करा

Devi Lakshmi : जर तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल तर, शुक्रवारी रात्री देवी लक्ष्मीचे हे निश्चित उपाय करा, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, जाणून घ्या शुक्रवारी करावयाचे उपाय

Devi Lakshmi marathi news

1/8
शुक्रवार हा धन आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते. या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत केल्यास संकटे दूर होतात. शुक्रवारी रात्री या गुप्त उपायांनी तुम्ही आर्थिक संकटाची समस्या दूर करू शकता.
2/8
शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून लक्ष्मीची पूजा करा. पूजेमध्ये ‘ऐं ह्रीं श्रीं अष्टलक्ष्मीयै ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छागच्छ नम: स्वाहा’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच शुक्रवारी रात्री श्री लक्ष्मी सुक्ताचे पठण करावे.
3/8
शुक्रवारी मध्यरात्री लक्ष्मीचे आठवे रूप अष्टलक्ष्मीची पूजा करावी, श्रीयंत्र ठेवावे, तुपाचे आठ दिवे लावावेत, गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी, पांढरी मिठाई अर्पण करावी. तसेच कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. पूजेदरम्यान मातेला गुलाबी फुले अर्पण करा आणि खीर अर्पण करा.
4/8
शुक्रवारी रात्री देवी मातेचे ध्यान करा, पूजा आणि ध्यानात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची विशेष काळजी घ्या. अन्यथा पूजा विस्कळीत होऊ शकते.
5/8
शुक्रवारी रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच भगवान विष्णूचीही पूजा करा. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
6/8
या दिवशी दक्षिणावर्ती शंखाने भगवान विष्णूला अभिषेक करावा
7/8
ज्योतिषशास्त्रानुसार, हे उपाय केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि पैसा कधीही कमी होणार नाही.
8/8
(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola