Ashadhi Wari: अमेरिकेच्या ह्यूस्टन टेक्सास शहरात एकादशी साजरी, पालखीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी
महाराष्ट्रात आषाढी एकादशी आनंद सोहळा साजरा होत असतानाच साता समुद्रापलीकडे अमेरिकेतही आषाढीचा सोहळा साजरा करण्यात आलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमावळा ऑफ अमेरिका संस्थेच्या वतीनं अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन शहरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी साजरी करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीची शोभायात्राही काढण्यात आली.
48 डिग्री सेल्सिअसच्या तापमानातही भारतीय मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी भेटीनंतर सर्वांनी भजन, कीर्तन गायलं, तसंच फुगड्या खेळत आनंद साजरा केला.
देशाबाहेर पहिल्यांदाच अमेरिकेत वारीचा उत्साह पाहायला मिळाला.
ही सातासमुद्रापार अमेरिकेतील वारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डोक्यावर तुळस, मुखी माऊलीचे नाव, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, खाद्यांवर पताका आणि हातात टाळ-मृदंग अशा वेशात अमेरीकेत भारतीय वारकरी वारीत तल्लीन झाले आहेत.
काही फुगडी खेळताना दिसत आहेत तर काही हरिनामाचे भजन टाळ-मृदुंगात वाजवताना दिसत आहे.
काही डोक्यावर तुळस घेऊन वारीत सहभागी झालेले दिसत आहेत