Ashadhi Wari 2023: 'पांडुरंगाच्या चरणी अभिनव सायकलवारी', छ.संभाजीनगरमधून चाळीस सायकलस्वार पंढरपूरला
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून सायकलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून चाळीस जणांचा ग्रुप नुकताच पंढरपूर वारी सायकलवर करून यशस्वीपणे परतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App9 जून रोजी छत्रपती संभाजीनगरयेथून सायकलिंग फाउंडेशनचे डॉ. दिपक कुंकलोळ आणि डॉ. सुदाम बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोबत 40 सायकलस्वार सदस्यांचा ग्रुप पंढरपूरकडे रवाना झाला होता.
या दरम्यान त्यांनी बीड जिल्ह्यातील चौसाळा या ठिकाणी मुक्काम केला होता.
सकाळी पहाटेच दहा तारखेला पुन्हा सायकल प्रवासात सुरुवात करून हा ग्रुप सायंकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान यशस्वीपणे पंढरपूरला पोहोचला.
तिथे सायकलवरच विठ्ठलाच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली व रेल्वे मैदान येथे आगळे वेगळे सायकल रिंगण करून पंढरपुरा प्रति आपली भक्ती अर्पण केली.
अनोख्या सायकल वारीचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते पुढच्या वारीला आणखी जास्त सदस्यांचा सहभाग आणि सहवास लाभणार असल्याची माहिती डॉ.दीपक कुंकलोळ यांनी दिली.
या सायकलिंग फाउंडेशनच्या माध्यमातून निसर्गाप्रती आपली आत्मीयता आणि आपल्या आरोग्य विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी सायकल हे माध्यम निवडण्यात आले.