Aashadhi Wari 2023 : मातीच्या विटेवर रेखाटले पांडुरंग...
उद्या आषाढी एकादशी... आषाढीनिमित्त केवळ पंढरीच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआषाढी एकादशीला पांडुरंगाच्या चरणी प्रत्येकालाच माथा टेकवण्याचा योग येत नाही.
पण प्रत्येक व्यक्ती या ना त्या मार्गाने पांडुरंगाची सेवा मात्र नक्की करतो.
अनुजा जोशी त्यापैकीच एक, तिने कुंचल्यातून तिची भक्ती सादर केली आहे
मातीच्या विटेवर अनुजा ने तिच्या मनातले पांडुरंग रेखाटले आहेत.
तिने पांडुरंगाला साक्षात पाहिलं नसलं तरी या विटेवरचे पांडुरंगच तिला भेटलेले आहेत.
अनुजाने आजवर बऱ्याच प्रकारच्या पेंटिंग केल्या आहेत.
हातावर महालक्ष्मी पेंटिंग, बेलाच्या पानावर महादेवाचं, आंब्याच्या पानावर गुढीपाडव्याच, केळीच्या पानावर रामाच पिंपळाच्या पानांवर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज, रुईच्या पानावर हनुमानाच अश्या बऱ्याच झाडांच्या पानांवर तिने पेंटिंग केले आहेत.
त्याच सोबत नारळावर अमर देवीचे पेंटींग, सुपारीवर, गणपती अंबाबाई चे पेंटिंग सुद्धा केलं आहे
विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आणि शेकडो मैलांची पायपीट करीत आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे (Pandharpur) निघालेले पालखी सोहळे आज पंढरीत प्रवेश करणार आहेत
त्यांच्यासोबत लाखोंचा महासागर पंढरीत दाखल होणार आहे. आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज, देहू येथून निघालेले जगतगुरु तुकोबाराय, सासवड येथून निघालेले संत सोपानदेव, चांगा वटेश्वर यांच्यासह अनेक पालखी सोहळे काल अखेरच्या मुक्कामासाठी वाखरी येथील पालखी तळावर विसावले होते.