North Korea : उत्तर कोरियात आहे लाल लिपस्टिकवर बंदी, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क.
उत्तर कोरिया हा असा देश आहे जिथे लोकांना आपल्या राज्यकर्त्यांनी बनवलेल्या नियमांचे पालन करावे लागते. खरं तर इथल्या हुकुमशाही राज्यकर्त्याने फॅशनशी संबंधित अनेक नियम बनवले आहेत, जे न पाळल्याबद्दल लोकांना कठोर शिक्षा भोगावी लागते. या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जगभरात ज्या लाल लिपस्टिकला खूप पसंती मिळते, त्यावर या देशाने बंदी का घातली आहे. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर कोरियात महिलांना लाल लिपस्टिक लावता येत नाही, कारण या देशात त्यावर बंदी आहे. या देशात फॅशनशी संबंधित अनेक विचित्र नियम आहेत. लाल लिपस्टिकवर बंदी घालण्याचे कारण म्हणजे येथील हुकूमशहा राज्यकर्ते हा रंग भांडवलशाही आणि व्यक्तिवादाशी जोडू पाहतात.(Photo Credit : pexels)
तसेच या देशात असे मानले जाते की लाल रंग एक भावना दर्शवितो ज्याचा अर्थ असा होतो की स्वत: पेक्षा मोठे कोणीही नाही. अशा तऱ्हेने किम जोंग उन यांना आपल्या देशातील कोणतीही व्यक्ती राज्यकर्त्यापेक्षा जास्त नको आहे.(Photo Credit : pexels)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी उत्तर कोरियात गस्त घालण्यात आली आहे. येथील पोलिस लोकांच्या वैयक्तिक वस्तूंची तपासणी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि नियम मोडल्यास मोठ्या दंडाची तरतूद आहे. अशावेळी महिला येथे लाल ऐवजी लाइट शेड लिपस्टिक लावू शकतात.(Photo Credit : pexels)
उत्तर कोरियातील नियमही केसांबाबत अतिशय कडक आहेत. इथे मुली आपले केस उघडे ठेवू शकत नाहीत किंवा वाढवू शकत नाहीत. (Photo Credit : pexels)
त्याचप्रमाणे येथे फक्त लहान केसांना परवानगी आहे आणि आपण केसांना रंग देऊ शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. किम जोंग उन यांनी पुरुषांसाठी फक्त ठराविक 10, तर महिलांसाठी 18 हेअरस्टाईलला मान्यता दिली आहे.(Photo Credit : pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)