Vegetables : आठवडाभरच्या भाज्या अशा करा फ्रीज मध्ये स्टोअर !
आता प्रश्न असा पडतो की या भाज्या जास्त काळ ताज्या ठेवायच्या कशा? भाजी जास्त वेळ ताजी ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर केला जात असला तरी काहीवेळा भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही काही भाज्या खराब होतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजीपाला व्यवस्थित साठवून न ठेवणे हे त्याचे कारण आहे.भाजीपाला वेगवेगळ्या प्रकारे साठवावा लागतो. [Photo Credit : Pexel.com]
काही भाज्या खोलीच्या तपमानावर ताज्या ठेवता येतात तर काही फ्रिजमध्ये ठेवून ताज्या राहतात. अशा परिस्थितीत कोणती भाजी कशी साठवून दीर्घकाळ ताजी ठेवता येईल ते जाणून घेऊया.[Photo Credit : Pexel.com]
अशा प्रकारे पालेभाज्या साठवा : पालक आणि कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या साठवण्यासाठी या भाज्या थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. [Photo Credit : Pexel.com]
या भाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी नीट धुवून कोरड्या कराव्यात. यानंतर या भाज्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि सीलबंद पॅकमध्ये ठेवा. अशा प्रकारे पॅक केल्यानंतर, आपण भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.[Photo Credit : Pexel.com]
बटाटे, कांदे आणि यासारख्या इतर भाज्या साठवा : बटाटे आणि कांदे यांसारख्या भाज्या 1 ते 2 आठवडे सहज साठवता येतात. बटाटे आणि कांदे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. त्यांना थंड आणि गडद ठिकाणी ठेवा. [Photo Credit : Pexel.com]
काकडी आणि टोमॅटो पाण्यात टाका आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे साठवून ठेवल्यास या भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतील. गाजर धुऊन वाळल्यानंतरच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]