How to store Mint leaves : अशा प्रकारे ठेवा पुदिन्याची पाने, यामुळे लवकर खराब होणार नाही.
पुदिना ही अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण औषधी वनस्पती आहे, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुम्ही फेस पॅकमध्ये ही पुदिन्याचा वापर करू शकता. ज्यामुळे त्वचा थंड राहण्याबरोबरच ताजेपणा आणि सौंदर्यही मिळते. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात चटणी, स्मूदी, शर्बत, मॉकटेल अशा अनेक गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. पुदिन्याचा सुगंध आणि चव पदार्थाची चव वाढवते. एवढ्या गोष्टींमध्ये वापरल्यामुळे आपण एकाच वेळी विकत घेऊन ठेवतो. (Photo Credit : pexels )
पण एक-दोन दिवसांत त्याची पाने पुदिन्याची पाने जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी ती विकत घेतल्यानंतर किंवा तोडल्यानंतर देठापासून वेगळी करावीत. नंतर एका कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा. मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सर्व या टिप्सच्या मदतीने बराच काळ ताजे ठेवता येतात.(Photo Credit : pexels )
पुदिन्याची पाने जास्त वेळ वापरण्यासाठी एक जार घ्या आणि त्यात पाणी भरा. आता त्यात खोडाच्या बाजूने पुदिना घाला. ही पाने ओल्या कापडाने झाकून फ्रिजमध्ये ठेवावीत. पुदिना 10 ते 15 दिवस आरामात टिकेल.(Photo Credit : pexels )
पुदिना जास्त काळ टिकण्यासाठी पेपर टॉवेल घ्या आणि तो थोडा ओला करा. यामध्ये पुदिन्याची पाने देठापासून वेगळी करावीत. आता पुदिना टॉवेलने प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा. (Photo Credit : pexels )
पुदिन्याची पाने उन्हात वाळवण्याची चूक करू नका कारण यामुळे पुदिना खराब होतो आणि त्याचा सुगंधही राहत नाही. नेहमी थंड जागी ठेवा.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )