Parenting Tips : तुमचे मूलं अभ्यासात कमकुवत असेल तर करा हे पाच व्यायाम, लगेच दिसू लागेल फरक !
रोजच्या योगाभ्यासानेही मुलांच्या अशा समस्या दूर होऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या काही योगासन...(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यनमस्कार- सूर्यनमस्कार हा शरीर आणि मन या दोघांनाही ताजेपणा देणारा योगाभ्यास आहे. यात असलेल्या विविध आसनांमुळे शरीरातील सर्व प्रमुख स्नायू सक्रिय होतात, ज्यामुळे ऊर्जेचा संचार होतो आणि मानसिक एकाग्रता वाढते. (Photo Credit : pexels )
वृक्षासन – वृक्षासनामुळे मुलांमध्ये संतुलन आणि एकाग्र होण्याची क्षमता वाढते. हे आसन करताना मुले एका पायावर उभी राहतात आणि दुसरा पाय मांडीवर ठेवतात, ज्यामुळे त्यांच्या मनाची एकाग्रता आणि स्थैर्य वाढते.(Photo Credit : pexels )
पद्मासन- पद्मासन किंवा लोटस पोझ ही ध्यान आणि प्राणायाम साधनेसाठी एक आदर्श मुद्रा आहे. यामुळे मुलांची मानसिक स्थिरता आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे त्यांना अभ्यासादरम्यान अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )
बालासन किंवा चाइल्ड पोझ मुळे मुलांना विश्रांती आणि तणावमुक्ती मिळते. या आसनामुळे शरीर आणि मन शांत होते, जेणेकरून मुले अभ्यासात चांगली कामगिरी करू शकतील.(Photo Credit : pexels )
भ्रामरी प्राणायाम मुलांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक शांती प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मानसिक एकाग्रता वाढते आणि मुलाला अभ्यासाची आवड निर्माण होते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )