Beauty Hacks : एक्सपायर झालेली ब्युटी प्रॉडक्ट्स फेकून दिल्यापेक्षा अशाप्रकारे वापर केल्यास अनेक उपयुक्त गोष्टी होतील !
आज बाजारात अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. आता ते महाग असोत की स्वस्त, एकदा विकत घेतल्यावर, पूर्ण पणे न संपताच जेव्हा त्यांची मुदत संपते तेव्हा ते वाया जातात . (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुमचा मेकअप किंवा ब्युटी प्रॉडक्ट्सही न वापरता पूर्णपणे एक्सपायर झाले असतील तर ते फेकून देऊ नका.आता तुम्हाला वाटेल की फेकलं नाही तर काय करायचं. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही तुमच्या कामात त्यांचा कसा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )
अनेकदा असे एक्सपायर प्रॉडक्ट्स वापरल्याने त्वचा खराब होण्याची भीती असते त्यामुळे अशाप्रकारचे एक्सपायर प्रॉडक्ट्स त्वचेवर न वापरता त्यांचा अनेक प्रकारे वापर होऊ शकतो जेणेकरून ते वाया जाणार नाहीत . (Photo Credit : pexels )
प्रत्येक मुलीकडे एक-दोन नव्हे तर अनेक रंगांचे आयशॅडो असतात. हे वेगवेगळे रंग आता रोज वापरता येणार नाहीत. अशा वेळी तुम्हाला कळतही नाही आणि त्यांची मुदत संपते. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही नेल पॉलिशमध्ये टाकून नवीन नेल पेंट शेड बनवू शकता.(Photo Credit : pexels )
लिप बाम आकाराने लहान असले तरी त्याचा पूर्ण वापर केल्याशिवाय त्याची मुदत कधी संपते हे ही कळत नाही. अशावेळी ते फेकण्याऐवजी तुम्ही तुमचे शूज चमकवण्यासाठी किंवा पँटची खराब झिप दुरुस्त करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )
फेशियल टोनरचा वापरही आज अनेकजण करतात. हे आपल्या त्वचेचे पीएच संतुलित करण्याचे काम करते, परंतु आपण बर्याच वेळा त्यांचा वापर करण्यास विसरतो आणि ते लवकर संपत नसल्यामुळे त्यांची मुदतदेखील संपते. तुम्हीही त्यांना निरुपयोगी मानून फेकून दिले तर तुम्ही तसे करणे टाळू शकता. मोबाइल किंवा लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी किंवा घर आणि कारच्या काचा साफ करण्यासाठी तुम्ही एक्सपायर्ड टोनरचा वापर करू शकता.(Photo Credit : pexels )
ग्रूमिंगसाठी ही चांगला वास आवश्यक असतो. अशावेळी परफ्यूमचा भरपूर वापर केला जातो, पण लोक वेगवेगळ्या वासानुसार ते विकत ही घेतात आणि ते पूर्णपणे न वापरता एक्सपायर होतात. अशावेळी तुम्ही त्यांचा वापर फेकण्याऐवजी रूम फ्रेशनर म्हणून किंवा बाथरूममध्ये करू शकता.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )