Makar Sankranti Bhogi bhaji : 'हे' आहे भोगीच्या भाजीचे महत्त्व!
उद्या 14 जानेवारी रोजी भोगी आहे. मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते. या दिवशी ‘भोगीची भाजी’ करण्यात येते. याच आरोग्यदायी भाजीचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. [Photo Credit : Google.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजानेवारी महिन्यात शेतात पीक बहरलेले असल्याने बाजारात मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात. [Photo Credit : Google.com]
या ऋतूत मटार, गाजर, वांगी, तीळ , हरभरा, पावटा, घेवडा, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत असतात. [Photo Credit : Google.com]
भोगी च्या दिवशी या सर्व भाज्या वापरून भोगीची भाजी करतात.यामुळे चांगली उष्णता शरीराला मिळते. [Photo Credit : Pexel.com]
वांगे: थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत किंवा वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते. [Photo Credit : Pexel.com]
तीळ: तीळ हे स्निग्ध पदार्थ असून यामुळे शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. [Photo Credit : Pexel.com]
थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात भाजीपाला मिळतो आणि शरीराला उर्जेचीही गरज असते. या दिवसात नैसर्गिकरित्या भूक वाढते आणि खाल्लेले अन्न शरीराला व्यवस्थित लागते, पचनही चांगले होते. म्हणूनच भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी केली जाते. [Photo Credit : Pexel.com]
हरभरा: हरभरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. [Photo Credit :Google.com]
हिरवे वाटाणे : हे व्हिटॅमिन सीच्या सर्वाधिक स्त्रोतांनी भरलेले आहे. [Photo Credit : Pexel.com]
बाजरी: बाजरी खाणे उत्तम मानले जाते. शरीराला उष्णता देणारा आणि कफनाशक असा बाजरी हा पदार्थ आहे यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसह अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला उब मिळून थंडी वाजत नाही. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]