Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Skin care : भेंडीतील चिकट पदार्थ त्वचेसाठी फायदेशीर; चेहऱ्यावरील मुरुम, सुरकुत्या होतील कमी...
भेंडीतून बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे मोठ्या प्रमाणात गुणधर्म असतात. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 यांनी भेंडी समृद्ध आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभेंडीतून बाहेर पडणाऱ्या चिकट पदार्थांमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्वांमुळे तुमच्या त्वचेवरील संसर्ग दूर होतात आणि पिंपल्सची समस्या कमी होते. (Photo Credit : unsplash)
भेंडीतील चिकट पदार्थापासून भेंडीच पाणी तयार होत. त्वचा मोठ्या प्रमाणात हायड्रेट करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरतं. तुमची त्वचा कोरडी असेल तर या पाण्याने चेहरा धुणे फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)
भेंडीच पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, त्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. कमी वयात चेहेऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या दूर होतात. (Photo Credit : unsplash)
भेंडीच पाणी कोलेजन वाढवण्यास मदत करते, त्यामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत मिळते. (Photo Credit : unsplash)
भेंडी मधील बीटा कॅरोटिन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी भेंडीच पाणी उपयुक्त ठरते. (Photo Credit : unsplash)
भेंडीच पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने त्वचा मऊ आणि तेजस्वी होते. (Photo Credit : unsplash)
भेंडी कापून पाण्यामध्ये ठेवा. हळूहळू भेंडीतील चिकट पदार्थ पाण्यात विरघळू लागेल. अशाप्रकारे भेंडीचे पाणी तयार झाले. (Photo Credit : unsplash)
या पाण्याने रोज २-३ वेळा चेहरा धुतल्यास चेहरा तजेलदार होतो आणि त्वचा मऊ राहते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)