Natinal Handloom Day : भारतातील अनेक हातमाग उद्योग समूहांपैकी काही प्रमुख हातमाग उद्योग
भारताच्या देशाचा विचार केला तर पाहायला मिळते की, प्रत्येक राज्यानुसार आणि तिथल्या लोककलांनुसार हातमाग उद्योगामध्ये वैविध्यता पाहायला मिळते.तसेच भारताच्या विविध संस्कृंतीचाही पगडा उद्योगावर अवलंबून असल्याचे पाहायला मिळते.प्रत्येक राज्याची विशिष्ट ओळख ही तिथल्या संस्कृतीवर आणि लोककलेवरून केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर भारतातील हिमाचल राज्याची संस्कृती आणि हवामान यांची सांगड घालत हमिरपूर वस्त्राची निर्मिती हिमाचल प्रदेशात केली जाते.या उद्योगामुळे हिमाचल प्रदेशाची ओळख निर्माण झाली.हमिरपूर हे हिमाचल प्रदेशातील जिल्हास्तरीय शहर आहे.
राजस्थान राज्यातील जयपूरचा हातमाग उद्योग हा आजही पारंपरिकरित्या केला जातो. राजस्थान प्रदेशातील हातमाग उद्योगात नैसर्गिक पद्धतीने रंगांचा वापर करून वस्त्रांवर अतिशय सुंदर डिझाईन केली जाते. यासाठी राजस्थानने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मध्य प्रदेश हा इंदूरच्या विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या वस्त्रांसाठी ओळखला जातो.इंदूरचे वस्त्र आजही तितकेच मध्यप्रदेशाची विशिष्ट ओळख मिळवून देते.
महाराष्ट्र राज्य हे भारत देशातील कलांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची शान म्हणून ज्या वस्त्राकडे पाहिले जाते ती पैठणी. येवले हे एक विशिष्ट शहर पैठणी निर्मितीसाठी ओळखले जाते. आजही येवले या ठिकाणी पैठणीचा पूर्वापार व्यवसाय सुरु आहे.
दक्षिण प्रदेशात अनेक विविध प्रकारची वस्त्र निर्मिती आजही विशिष्ट नावाने ओळखली जाते.
आंध्र प्रदेशाचे कलमकारी वस्त्र ओळखले जाते. आंध्र प्रदेशचे हवामान, कृषी उत्पादन, भौगोलक परिस्थिती, आणि संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो.
केरळची कांचिवरम, कर्नाटक राज्याची ओळख ही इरकल सिल्क या वस्त्रामुळे निर्माण केली जाते.
तेलंगणा राज्यात विविध प्रकारचे वस्त्र निर्माण केले जाते. गोडवाल, पोच्मपली वस्त्रे भौगोलिक प्रदेशानुसार, कृषीक्षेत्रानुसार निर्माण होते. आजही या वस्त्रांना विशेष ओळख निर्माण होते.
भौगोलिक प्रदेशानुसार आजही या वस्त्रांना विशेष ओळख निर्माण होते.