Makar Sankranti Wishes 2023 : मकर संक्रांतीनिमित्त तुमच्या प्रियजनांना 'या' खास शुभेच्छा द्या; अन् सणाचा आनंद द्विगुणित करा
मकर संक्रांतीचा सण आला आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू, हलव्याचे दागिने आणि तीळाचे लाडू पाहायला मिळतायत.
सण म्हटला की नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देणंही आलं. आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा देणं फार सोपं झालं आहे.
त्यामुळे शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच तुमच्या प्रिय व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता आणि सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.
नवविवाहित दांपत्यांसाठी हा दिवस खास असतो. या दिवशी सुहासिनी हलव्याचे दागिने परिधान करतात.
या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र-मंडळींना देऊ शकता.
सूर्य या दिवशी धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
मकर संक्रांतीला महाराष्ट्रात संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती असं म्हटलं जातं
मकर संक्रांतीला अनेक सामाजिक उपक्रम तसेच सण अगदी आनंदात आणि उत्साहाने साजरे केले जातात.
हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. त्यामुळे येणारी मकरसंक्रांत ही तुमच्या आयुष्यातील कटुता दूर करून प्रेमाचा गोडवा दरवळत राहावा या शुभेच्छा.