Skydiving Spots : तुम्हाला स्काय डायव्हिंगचे वेड आहे का? असल्यास 'हे' स्पॉट तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीत.
जर तुम्हाला सुट्टीतील एडवेंचर करायला आवडत असेल, तर तुम्ही स्काय डायव्हिंगसाठी भारतातील या खास ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करू शकतात.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रवास हा सामान्यतः लोकांच्या मनोरंजनाचा भाग झाला आहे. आजकाल लोक वर्षातून दोन ते तीन वेळा सुट्ट्यांचे नियोजन फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. (Photo Credit : Pixabay)
सुट्टीच्या दिवशी अनेकांना विविध प्रकारचे एडवेंचर करायला आवडते. अशा परिस्थितीत, लोकांना अशा ठिकाणी जायला आवडते जिथे ते त्यांच्या कुटुंबासोबत शांततेत वेळ घालवू शकतात. (Photo Credit : Pixabay)
जर तुम्हाला स्काय डायव्हिंगची आवड असेल, तर तुम्हाला भारतात अशी अनेक ठिकाणे सापडतील जिथे तुम्ही स्काय डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
जर तुम्ही या सुट्टीच्या दिवसात अशी ठिकाणे शोधत असाल जिथे स्काय डायव्हिंग केले जाते. (भारतातील स्काय डायव्हिंग स्पॉट) तर जाणून घ्या काही आकर्षक ठिकाणे. (Photo Credit : Pixabay)
अलीगढ: हे नाव तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल पण, दिल्लीजवळील अलीगढ हे स्काय डायव्हिंगसाठीही प्रसिद्ध आहे. येथे प्रशिक्षकांच्या मदतीने पर्यटकांना खुल्या आकाशाखाली स्काय डायव्हिंग करायला लावले जाते. (Photo Credit : Pixabay)
उत्तर प्रदेशातून अनेक लोक येथे येतात. तसेच हे ठिकाण दिल्लीपासून अगदी जवळ आहे, त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.(Photo Credit : Pixabay)
वीर बिलिंग, ज्याला हिमाचल प्रदेशचे एक अद्भुत पर्यटन स्थळ म्हटले जाते, ते स्काय डायव्हिंगसाठी देखील एक उत्तम ठिकाण आहे. स्काय डायव्हिंगचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देश-विदेशातून लोक येथे येतात.(Photo Credit : Pixabay)
म्हैसूर हे एक खास पर्यटन स्थळ आहे. कर्नाटकातील या पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो लोक येतात. येथे मनोरंजक साहसासाठी अनेक ठिकाणे आहेत. स्काय डायव्हिंगसाठी येथे खूप चांगली ठिकाणे आहेत. येथे अनेक पर्यटक स्काय डायव्हिंगसाठी येतात. (Photo Credit : Pixabay)
तुमचेही असेच नियोजन असेल तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, म्हैसूरसह वरील ठिकाणी जाण्याचे नियोजन तुम्हीही करू शकतात. (Photo Credit : Pixabay)