PHOTO : पावसाळ्यात एसीचं तापमान किती असायला हवं?
देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. मान्सूनच्या आगमनासोबत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी आर्द्रता जास्त असल्यामुळे उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी अनेक जण एअर कंडिशनर म्हणजेच एसीचा वापर करतात.
अनेक लोकांना पावसाळ्यातही एसीचं तापमान कमी ठेवायची सवय असते.
परंतु तुम्हाला माहित आहे का, यामुळे तुमच्या त्वचेचं किती नुकसान होऊ शकतं?
नेहमी एसीमध्ये राहिल्याने त्वचेची आर्द्रता नष्ट होऊ शकते. त्वचा कोरडी आणि निर्जीव होऊ शकते.
याशिवाय तुम्हाला सर्दी-खोकल्याच्या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं.
पाऊस पडल्यानंतरही आर्द्रता कायम असेल तर एसी ड्राय मोडवर ठेवावा.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात एसीचं तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअस ठेवा.
कारण कमी तापमानामुळे तुम्हाला अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.