Green Tomato: जाणून घ्या हिरवे टोमॅटो खाण्याचे फायदे!
टोमॅटोचे नाव घेताच लाल रंग समोर येतो, पण तो हिरव्या रंगातही आढळतो. जेव्हा टोमॅटो कच्चा असतो तेव्हा त्याचा रंग हिरवा असतो, हिरव्या टोमॅटोमध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Tomato
1/10
टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भाजी बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटो लाल आणि हिरव्या अशा दोन्ही रंगात उपलब्ध आहेत.
2/10
बहुतेक लोकांना लाल टोमॅटो खायला आवडतात. हिरवे टोमॅटो देखील स्वादिष्ट लागतात. हिरव्या टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रथिने, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
3/10
हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असते जे दृष्टी वाढवण्याचे काम करतात. तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा सॅलडचा समावेश करून तुम्ही तुमची दृष्टी मजबूत करू शकता.
4/10
हिरवे टोमॅटो त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक आढळतात, जे त्वचेच्या पेशी सुधारण्याचे काम करतात. हिरव्या टोमॅटोच्या वापराने सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा सुंदर दिसते.
5/10
हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. हे खाल्ल्याने सर्दी, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका दूर राहतो.
6/10
हिरवे टोमॅटो खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे काम करते.
7/10
रक्तदाब नियंत्रणात ठेवल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
8/10
हिरव्या टोमॅटोमध्ये असलेले पोषक तत्व रक्त गोठण्यास मदत करतात.
9/10
यामध्ये व्हिटॅमिन के असते जे रक्ताच्या गुठळ्या तयार करण्यास मदत करते. जर तुम्हाला कुठे दुखापत झाली तर, व्हिटॅमिन K रक्ताची गुठळी बनवते आणि रक्तस्त्राव थांबवते.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)
Published at : 05 Jan 2023 01:42 PM (IST)