Best time to Exercise : व्यायामासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? सकाळ की संध्याकाळ; वाचा!
व्यायामाचा परिणाम फक्त वेळावर नाही, तर आपल्या शरीराच्या प्रकार आणि जीवनशैलीवर देखील अवलंबून असतो. योग्य वेळ निवडा आणि आरोग्य सुधारा.
Benefits of Exercise (Photo Credit : Pinterest)
1/9
सकाळी व्यायाम करणं चांगलं की संध्याकाळी? शरीराच्या प्रकृतीनुसार आणि जीवनशैलीनुसार त्याचे परिणाम बदलतात.
2/9
सकाळी व्यायामाचे फायदे, सकाळी हवेत प्राणवायू मुबलक असतो, त्यामुळे व्यायाम केल्याने शरीर ताजेतवाने होतं.
3/9
दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं.
4/9
वजन कमी करण्यासाठी सकाळी व्यायाम अधिक उपयोगी ठरतो.
5/9
संध्याकाळी व्यायामाचे फायदे, संध्याकाळी स्नायू लवचिक आणि उबदार झालेले असतात, त्यामुळे जास्त मेहनतीचे व्यायाम (strength training, cardio) करता येतात.
6/9
दिवसभराचा ताण-तणाव कमी होतो.व्यायामात सातत्य ठेवणं सोपं जातं, कारण वेळ अधिक मिळतो.
7/9
थोडक्यात, सकाळी व्यायाम केल्यास ताजेतवानेपणा आणि वजन कमी होण्यासाठी फायदा, तर संध्याकाळी व्यायाम केल्यास ताकद आणि सहनशक्ती वाढते.
8/9
त्यामुळे आपल्या वेळेनुसार आणि शरीराला ज्या वेळी जास्त सोयीचं वाटतं, त्यावेळी नियमित व्यायाम करणं सर्वात उत्तम.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 03 Oct 2025 03:37 PM (IST)