Know Best Way To Avoiding Depression : तुम्हालाही तणाव आणि नैराश्यापासून दूर राहायचे ? मग आजपासूनच 'या' प्रभावी टिप्स फॉलो करा
कामाचा ताण आणि पर्यावरणाचा ताण हा जीवनाचा भाग बनला आहे. तणाव आणि नैराश्याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतांना दिसतोय. (Photo Credit :Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतणावाखाली राहिल्याने वर्तनावरही परिणाम होतो. व्यक्ती नेहमी उदास, अस्वस्थ, चिडचिड आणि रागावलेली असते. आजच्या व्यस्त जीवनशैलीत नैराश्य किंवा ताणतणाव सामान्य झाले आहेत.(Photo Credit :Pixabay)
अशा परिस्थितीत, बहुतेक लोक त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेळोवेळी तणाव वाढत जातो आणि तणाव वाढल्याने गंभीर आजार देखील होऊ शकता. (Photo Credit :Pixabay)
तसेच जास्त तणावाखाली राहिल्याने तुम्हाला मानसिक आजारही होऊ शकतात. पण, छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तणाव आणि नैराश्य यांना स्वतःपासून दूर ठेवता येते. तणाव आणि नैराश्यावर मात करण्याचे हे काही प्रभावी उपाय जाणून घ्या. (Photo Credit :Pixabay)
तणाव नियंत्रित केला पाहिजे. त्यामुळे अनेक गंभीर आजार टाळता येतात. तसेच तुम्ही तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवावे. याच्या मदतीने तणावाचे व्यवस्थापन सहज करता येते.(Photo Credit :Pixabay)
अतिविचार टाळा आणि तुम्ही नियंत्रित करू शकत नसलेल्या घटनांबद्दल जास्त काळजी करू नका. त्याचबरोबर तणावपूर्ण वातावरणात आक्रमक होण्याऐवजी नेहमी संयम ठेवा.(Photo Credit :Pixabay)
तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. यामुळे तणावाचा ताबा घेण्यास प्रतिबंध होतो. तसेच वेळेचा योग्य वापर केला पाहिजे. यामुळे तुम्ही व्यस्त राहाल आणि तणावाचे व्यवस्थापन सहज होईल.(Photo Credit :Pixabay)
सर्वात जास्त तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी ओळखा आणि त्या टाळण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर तणाव कमी करण्यासाठी अल्कोहोल, ड्रग्ज किंवा मादक पदार्थ या गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत.(Photo Credit :Pixabay)
तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि कुटुंबासोबत पुरेसा वेळ घालवा. त्यामुळे तणाव सहज दूर ठेवता येऊ शकतो. तसेच तणाव कमी होत नसल्यास, मानसशास्त्रज्ञाकडे जा. त्यांना तुमच्या समस्या सांगा. (Photo Credit :Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit :Pixabay)