Kiwi Fruite:किवी आहे हाडाच्या बळकटीसाठी फायदेशीर जाणून घ्या सविस्तर माहिती !
निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घातली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. मात्र, आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरूवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.(Photo credit: Unsplash)
या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करणे देखील फायद्याचे ठरते. या कामी किवी हे फळ तुमची मदत करू शकते. (Photo credit: Unsplash)
किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात तर हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे. आज आपण हिवाळ्यात किवी खाण्याचे फायदे कोणते आहेत? जाणून घेणार आहोत (Photo credit: Unsplash)
किवीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश आढळून येतो. एक कप किवीमध्ये साधारणपणे ६१.२ मिलीग्रॅम कॅल्शिअमचे प्रमाण आढळून येते. त्यामुळे, किवीचे सेवन केल्याने आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा तर मिळते (Photo credit: Unsplash)
शिवाय, हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, अशा लोकांनी हाडांच्या मजबूतीसाठी आहारात किवीचा समावेश करावा.(Photo credit: Unsplash)
थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो. (Photo credit: Unsplash)
या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा.फायबर्समुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. (Photo credit: Unsplash)
तसेच, आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास किवी लाभदायी ठरते. ज्यांची पचनक्षमता कमकुवत आहे किंवा, ज्यांना पोटाच्या समस्या आहेत. त्या लोकांनी आहारात किवीचा जरूर समावेश करावा.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)