Valentines Week : दूर आहात म्हणून काय झालं, जोडीदारासोबत असा साजरा करा ‘हग डे’
सहवेदना आपल्या जोडीदाराला सांगून मन हलके करावे, जोडीदारांच्या उबदार मिठीत जाउन त्याच्या सहवासात काही काळ घालवावा.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतो नेहमी आपल्या सोबत असल्याचा अनुभव घ्यावा, असे कधी ना कधी प्रत्येकालाच वाटत असते.(Photo Credit : Pixabay)
त्यामुळेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) आठवड्याभराच्या दिवसांमध्ये एक दिवस म्हणजे ‘हग डे’(Hug Day) असतो. या दिवशी जोडीदार एकमेकांना मिठी मारत सहवास (Cohabitation) अनुभवत असतात. (Photo Credit : Pixabay)
जेव्हा जेव्हा आपल्या प्रिय व्यक्तीला दुःख होते तेव्हा आपण त्याला मिठी मारून आपण सोबत असण्याची भावना देत असतो. (Photo Credit : Pixabay)
पण अनेक वेळा काही कारणास्तव आपल्याला जोडीदारासोबत राहता येत नाही, दुरावा सहन करावा लागत असतो. (Photo Credit : Pixabay)
अशा वेळी या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दूर राहूनदेखील हा दिवस ‘खास’ साजरा करु शकतात.(Photo Credit : Pixabay)
तुम्ही काही कारणांमुळे आपल्या जोडीदारापासून लांब असाल तरीही त्याच्याशी सतत कुठल्याही माध्यमातून संवाद साधत रहा. या दिवसांमध्ये त्याला तुम्ही सोबत असल्याचे सांगत रहा.(Photo Credit : Pixabay)
संवादातूनही तुम्ही, जोडीदार आणि तुमच्यातील शारीरिक दुरावा कमी करू शकतात. (Photo Credit : Pixabay)
आपल्या जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा करा, बोलण्यात नेहमी सकारात्मकता ठेवा, हे दूराव्याचे दिवस लवकरच निघून जातील व तुम्ही ऐकमेकांसोबत रहाल, ही भावना त्याच्या मनात निर्माण करावी.(Photo Credit : Pixabay)