Eyebrows Care : काळ्या आणि जाड भुवया चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात, करा 'हे' घरगुती उपाय
काळ्या आणि जाड भुवया तुमच्या सौंदर्यात भर घालतात. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढते. जर तुम्हाला तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसावा असे वाटेत असेल तर तुमच्या भुवया जाड करा. नैसर्गिक पद्धतीने भुवया काळ्या आणि जाड करण्याकरता काही घरगुती उपाय करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभुवया जाड आणि दाट होण्यासाठी एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल वापरल्याने केसांची वाढ सुधारते. याशिवाय भुवया मजबूत होतात. या तेलामध्ये फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स असे अनेक प्रकारचे गुणधर्म आढळतात आणि ते भुवयांना पोषण देते. याच्या मदतीने भुवया दाट करता येतात.
डोक्यावरील केसांप्रमाणेच भुवयांचे केसही दाट होण्यासाठी खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे तुम्हाला तुमच्या भुवया दाट करण्यास मदत करू शकतात.
जाड भुवया मिळविण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी ऑलिव्ह ऑईलचे 2 ते 3 थेंब घ्या. आता भुवयांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे मसाज करा. यामुळे भुवयांची वाढ सुधारेल.
भुवया काळ्या आणि जाड करण्यासाठी कांद्याचा रस लावा. कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने भुवया काळ्या आणि दाट होतात. यासाठी 1 कांद्याचा रस काढा. आता भुवयांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर चेहरा धुवा.
दिवसातून एकदा कापसाच्या साहाय्याने एक चमचा कच्चे दूध भुवयांवर लावा. असे केल्याने तुमच्या भुवया अधिक दाट होतील.
1 कप पाण्यात मेथीचे दाणे टाकून रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी बारीक करून भुवयांना 10 मिनिटे लावा. तुमच्या भुवया जाड होतील.
दिवसातून दोनदा बोटांच्या साहाय्याने भुवयांवर कोरफडीच्या जेलचा हलका मसाज करा.
लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे करून ते ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलात दोन-तीन दिवस भिजत ठेवा. 3 दिवसांनंतर, दररोज झोपण्यापूर्वी हे मिश्रण आपल्या पापण्या आणि भुवयांवर लावा. तुम्ही हे रोज झोपण्यापूर्वी करू शकता. याने भुवया दाट होतील.
व्हिटॅमिन-ई कॅप्सूलमधून तेल काढा आणि ते दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या भुवयावर लावा. असे केल्यास भुवया दाट होतील.