Mansoon Hacks : पावसाळ्यात कपडे कसे सुकवावेत? जाणून घ्या सोप्या टिप्स
बहुतेक लोक घरचे किंवा बाहेरचे ओले कपडे गुंडाळा करून लाँड्री बॅगमध्ये टाकतात. गुंडाळे करून कपडे टाकल्याने त्याला कुबट वास तसाच राहतो. यामुळे कपडे धुतल्यानंतरही कपड्यांना घाणेरडा वास तसाच राहतो. म्हणून कपड्याचा गुंडाळा करून टाकणे टाळावे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसात भिजून आल्यास कपडे लगेच धुवायला टाकावेत जेणेकरून कपड्यांना वास येणार नाही.
पावसाळ्यात शक्य असल्यास तुमचे कपडे गरम किंवा कोमट पाण्याने धुवा.
धुतलेले कपडे नीट पिळून घ्या किंवा वाॅशिंग मशीनच्या (Washing Machine) मदतीने ते वाळवा.
ज्या पाण्याने तुम्ही कपडे धुणार आहात त्यात लिंबाचा रस मिसळा. असे केल्यास कपड्यांना घाण वास येणार नाही.
हँगरचा वापर करूनही तुम्ही कपडे वाळवू शकता.
कपड्यांना सुगंध येण्याकरता बाजारात कम्फर्ट वाॅशिंग लिक्वीड उपलब्ध आहे.
याशिवायओले कपडे वाळवण्याकरता तुम्ही मीठाचा (Salt) वापर करू शकतो. यामुळे कपड्यांना दुर्गंध येणार नाही.
पावसाळ्यात हवामानातील आर्द्रतेमुळे कपाटात ठेवलेल्या कपड्यांना देखीस कुबट वास यायला लागतो. अशा वेळी तुमच्या कपाटात कापूर (Camphor) किंवा डांबर गोळ्या ठेवा