Home Remedy: या 5 गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळू शकते!
मचा आहार तुम्हाला रोग आणि आजारांचा शिकार बनवण्याचे काम करतो. फॅटी लिव्हर म्हणजे यकृतावर चरबी जमा होणे. फॅटी लिव्हरमुळे तुमचे यकृत नीट कार्य करू शकत नाही आणि अन्न पचणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि पित्त रस निर्माण करणे यासारख्या दैनंदिन कामात अडचण येऊ लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओट्स तुम्हाला केवळ वजन कमी करण्यातच नाही तर फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यातही मदत करू शकतात.
ओट्समध्ये असलेले फायबर, लो फॅट, कॉम्प्लेक्स कार्ब तुमच्या यकृताला आराम देण्याचे काम करतात.
सकाळी नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने फॅटी लिव्हरची समस्या कमी होऊ शकते.
आरोग्यदायी फळांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेलं अॅव्होकॅडो तुमच्या यकृतासाठी चांगली असते, जे तुम्हाला पचायला सोपी असते.
एवढेच नाही तर एवोकॅडोमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिडही मोठ्या प्रमाणात आढळते, जे तुमचे फॅटी लिव्हर कमी करण्यास आणि यकृताचे नुकसान भरून काढण्यास मदत करते.
आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग, लसूण हे अशा अनेक गुणधर्मांचे भांडार आहे, जे फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा किंवा शरीरातील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही लसूण पावडर खाऊ शकता, ज्यामुळे तुमच्या यकृतावरील चरबी कमी होण्यासही मदत होईल.
पालक आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात.
ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषकच पुरवत नाहीत तर यकृतावरील चरबी कमी करण्यासही मदत करतात.
फॅटी लिव्हरच्या बाबतीत, आपल्याला सैच्यूरेटेड चरबीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)