Health Tips : जर तुम्हाला अचानक खूप थकवा जाणवत असेल तर या चार गोष्टीचे सेवन करा...
आजकालच्या धावपळीच्य जीवनात आपल्याला अनेकदा शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो. जास्त वेळ काम केल्यामुळे, कमी झोप किंवा खाण्यापिण्याच्या अनियमित सवयींमुळे आपल्याला अशक्तपणा आणि सुस्तपणा जाणवतो.(Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसे काही पदार्थ आहेत ज्यात प्रथिने, कार्ब्स, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात.(Photo Credit : Unsplash)
त्यांचे सेवन केल्याने एनर्जी लेव्हल झपाट्याने वाढते. अशाच 5 पदार्थांबद्दफल जाणून घ्या जे तुमचा थकवा लगेच दूर करू शकतात.(Photo Credit : Unsplash)
ग्रीन टी, डार्क चॉकलेट, ड्राय फ्रूट्स आणि अंडी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते. या सर्व आहारामध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या शरिरातील कमतरता दूर करण्यास मदत करतात. (Photo Credit : Unsplash)
ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये आढळणारे पॉलीफेनोल सारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षणत करण्यास मदत करता. याशिवाय ग्रीन टीमध्ये अमिनो आम्ल, व्हिटॅमिन बी आणि कॅफिन सारखे घटक आढळतात.(Photo Credit : Unsplash)
ज्यामुळे एनर्जी लेव्हल वाढवून थकवा आणि कमजोरी दूर करण्यात मदत होऊ हकते. तसेच नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने थकवा दूर होतो आणि मानसिक ताणही कमी होतो.(Photo Credit : Unsplash)
डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेटमध्ये कॅफिन आणि थिओब्रोमाइन नावाची दोन रसायने असतात जी आपला थकवा दूर करण्यास मदत करतात. कॅफिन आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि थियोब्रोमाइन मनाला तजेला देते. या दोन्ही गोष्टींमुळे डार्क चॉकलेट काही मिनिटांतच आपला थकवा दूर करण्यास मदत करते. (Photo Credit : Unsplash)
सुका मेवा: सुक्या मेव्यामध्ये मॅग्नेशियम, लोह, जस्त आणि सेलेनियम सारखी खनिजे असतात ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो. त्यांच्याकडे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. तसेच, प्रथिने आणि फायबर पचन सुधारून ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सुका मेवा खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होऊ शकते. (Photo Credit : Unsplash)
अंडी : अंड्यांमध्ये आढळणारे प्रोटीन आणि हेल्दी फॅट घटक शरीराला ऊर्जा देतात. अंड्यातील पिवळ बलकमध्ये व्हिटॅमिन बी 12 मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. (Photo Credit : Unsplash)
अंड्यांमध्ये लोह, झिंक, सेलेनियम आणि इतर खनिजे आढळतात जे शारिरीक आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्ही आहारात अंड्यांचा समावेश करू शकता.(Photo Credit : Unsplash)