Health tips:पीरियड्स दरम्यान अशी काही लक्षणे दिसत असतील तर वेळीच काळजी घ्या.
या मासिक पाळीदरम्यान महिलांना काही लक्षणं दिसतात. त्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. (Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसे की, पोटदुखी, पाठदुखी, राग, चिडचिड, डोकेदुखी या सर्वांबरोबरच मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. (Photo credit: Unsplash)
मासिक पाळी दरम्यान अनेक महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर खूप रक्तस्त्राव आणि वेदनांचा सामना करावा लागतो. (Photo credit: Unsplash)
जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान काही विशेष लक्षणे दिसत असतील तर चुकूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. (Photo credit: Unsplash)
पीरियड्स दरम्यान काहींचा फ्लो जास्त असतो तर काहींचा फ्लो कमी असतो. (Photo credit: Unsplash)
पण, काही महिलांचा फ्लो जर सामान्यपेक्षा जास्त असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका (Photo credit: Unsplash)
मासिक पाळी दरम्यान वेदना होतेच. पण, या दरम्यान काही महिलांच्या वेदना या असामान्य असतात. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान जास्त वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा(Photo credit: Unsplash)
मासिक पाळीत जर तुम्हाला जास्त रक्ताच्या गाठी तयार होत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.(Photo credit: Unsplash)
मासिक पाळीत रक्ताचा बदलणारा रंग अनेक चेतावणी देतो. जर तुमच्या रक्ताचा रंग खूप गडद किंवा जाड असेल तर यातून तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे असे दिसून येते. (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)