Health Tips: सडपातळ शरीरामुळे त्रस्त आहात? वजन वाढवण्यासाठी 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश
जर तुम्ही सडपातळ असाल आणि लवकरात लवकर वजन वाढवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करायला हवा. जाणून घेऊया अशाच काही प्रथिनेयुक्त पदार्थांबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. प्रथिनांच्या व्यतिरिक्त, त्यात खनिजे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ए सारखे पोषक त्त्व देखील असतात. म्हणूनच बॉडी बिल्डर्सनेही त्याचं सेवन करणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारा हा स्वस्त उपाय आहे.
वजन वाढवण्यासाठी आणि मसल्स बनवण्यासाठी तुम्ही आहारातच दही, ताकाचा समावेश करू शकता. यात देखील बरंच प्रोटीन असतं जे वजन वाढवण्यासाठी मदत करेल. दह्यात प्रोबायोटिक्स देखील आहेत जे पाचन तंत्र सुधारतात.
वजन वाढवण्यासाठी तुम्ही आहारात माशांचाही समावेश करू शकता. माशांमध्येही प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. त्यात ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स देखील आढळतात ज्यामुळे स्नायूंचा विकास होण्यास मदत होते.
चणे आणि राजमा यांसारखी कडधान्यही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. त्याच्या वापराने स्नायू वाढण्यासही मदत होते.
अंड्याचे सेवन देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अंड्यामध्ये संपूर्ण प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. त्यामुळे स्नायू वाढण्यास मदत होते. याशिवाय त्यात अमिनो अॅसिड्स देखील आढळते, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास मदत होते.
चीज, दूध, ताक यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये केसिनचे प्रमाण जास्त असते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे स्नायूंना मजबूत करते.