Beat the Heat with this Cooler : या उन्हाळ्यात उष्णतेवर मात करण्यासाठी प्या ही शीतपेयं!
उन्हाळा म्हटला की कैरीचे पन्हे आलेच. उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. कैरीच्या पन्ह्याचा स्वाद हा आंबट गोड असतो. लहान मुलांना कैरी, तसेच कैरीपासून बनवलेल्या पन्ह्याची चव जास्तच आवडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमसाला ताक हे एक उत्तम थंड पेय आहे. यापासून शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो. मसाला ताक डिहायड्रेशनपासूनही बचाव करते. हाडे आणि दातांसाठी हे उत्तम आहे. त्यात जिरेपूड, काळे मीठ आणि चाट मसाला घालू शकता. मसाला ताकामुळे पचनशक्ती सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते, त्यामुळे या उन्हाळ्यात मसाला ताक नक्की प्या.
उन्हाळ्यात थंडगार जलजिरा प्यायल्यास उत्तम ठरेल. उन्हाळ्यात शरीरातील दाह कमी करून शरीराला थंडावा देण्यासाठी जलजिरा उपयुक्त आहे. हे एक असे पेय आहे जे आपल्याला थंड ठेवते आणि पचनासाठी देखील चांगले आहे. एक ग्लास जलजिरा प्यायल्यास त्यातून भरपूर प्रमाणात फायबर मिळते.
या उन्हाळ्यात थंडगार लिंबू शिकंजी हे पेय नक्कीच ट्राय करा. लिंबाचा रस, पुदिना, सोडा वॉटर, जिरे, काळे मीठ, धने पावडर टाकून तुम्ही शिकंजी तयार करु शकता.तयार झालेल्या शिकंजीवर तुम्ही बर्फाचे तुकडे आणि पातळ लिंबाचे गोल काप करुन टाका. त्यानंतर अजून बर्फाचे तुकडे टाकून त्यावर पुदिन्याची पाने टाका.
सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. उन्हाळ्यात फळांचा रस पिणे उपयुक्त ठरेल. शरिराला हायड्रेटेड ठेवण्यासोबतच फळांच्या रसामुळे शरिराला विविध जीवनसत्त्वे देखील मिळतात.
उसाचा रस हे उन्हाळ्यात उपलब्द झालेले आणखी एक शीतपेय. उसाचा रस सर्वांनीच प्रिय असतो, पण उन्हाळ्यात बर्फ घालून उसाचा रस पिणे टाळा. उसाच्या रसात पाण्याचे प्रमाण जास्त असू नये. कफ आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांनी मात्र उसाचा रस घेणे टाळावे.
उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात प्यायले जाणारे पेय म्हणजे कोकम सरबत. कोकम हे वात व पित्तनाशक फळ आहे. तसेच भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे हे गुण देखील कोकममध्ये आहेत. कोकम सरबत पचनासंबंधी व्याधी,अतिसार यात अत्यंत उपयुक्त ठरते.
उन्हाळ्यात गोड लस्सी पिण्याची मज्जाच वेगळी.त्याच बरोबर लस्सी प्यायल्याने हाडे मजबूत होतात. तसेच स्नायू दुखणेही दूर होते. गोड लस्सीमध्ये कॅल्शियम असते जे थकवा दूर करण्याचे काम करते. इतकेच नाही तर याच्या सेवनाने दातही मजबूत होतात.
उन्हाळ्यात दही-साखरेचे सेवन करणेही शरिराला थंड ठेवते. उन्हाळ्यात नियमितपणे दहीचे सेवन केल्यास वजन कमी करण्यासोबतच उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येवरही मात करता येते. उन्हाळ्यात नियमितपणे दही खाल्ल्यास पचनसंस्थाही निरोगी राहते.