Covid Immunity : BF.7 व्हेरियंटचा धोका, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 'हा' सोपा उपाय करा
Improve Immunity with Rock Salt : कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. चीन, जपान, अमेरिकेसह जगभरात कोरोनाचा ओमायक्रॉन प्रकार आणि त्याचा सबव्हेरियंट BF.7 मुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतातमध्ये ओमायक्रॉनचे चार रुग्ण आहेत. देशातील गेल्या 24 तासांत 227 रुग्ण सापडले असून सध्या देशात 3424 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्याचं आवाहनही केलं जातं आहे. यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढेल. यासोबतच तुम्ही काही घरगती उपायांनी तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता.
इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय आणि घरगुती उपाय येथे जाणून घ्या. हा उपाय फारच प्रभावी ठरेल. शिवाय हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अधिक पैसेही खर्च करावे लागणार नाहीत.
हा सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे सैंधव मीठ (Himalayan Salt). यालाच रॉक सॉल्ट (Rock Salt) असेही म्हणतात. पाण्यामध्ये सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होईल.
एक ग्लास पाण्यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ (Himalayan Salt) म्हणजे रॉक सॉल्ट (Rock Salt) मिसळा. आता हे पाणी सरबताप्रमाणे हळूहळू प्या.
सैंधव मिठामध्ये अनेक प्राकृतिक गुण आढळतात. यामुळे शरीराती तीनही दोष, वात-पित्त-कफ यांचे संतुलन राखले जाते. आयुर्वेदानुसार, वात-पित्त-कफ हे शरीराचं संतुलन राखतात. या तीन दोषांमधील असमतोल प्रत्येक रोगाचे मूळ असल्याचे मानले जाते.
सैंधन मिठाचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते आणि चयापचय वाढते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि कोणत्याही विषाणू किंवा जीवाणूंचा शरीरावर हल्ला रोखण्यास मदत होते.
तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी तुम्हाला दररोज एक ग्लास हे पाणी प्यावे लागेल. तुमच्या शरीराला आवश्यक खनिजे मिळतील. खनिजांच्या संतुलित प्रमाणामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल.
शरीरात काही आवश्यक खनिजांच्या कमतरतेमुळेही स्नायू दुखी आणि पेटके या समस्या उद्भवतात. एका ग्लास पाण्यात सैंधव मीठ मिसळून प्यायल्याने तुम्हाला या त्रासापासून आराम मिळेल.
मिठाचे अतिरिक्त सेवनामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. पण सैंधव मीठ रक्तदाब सामान्य ठेवण्यास प्रभावी आहे. सैंधव मीठ पोटॅशियमने समृद्ध असते, त्यामुळे या मिठामुळे रक्तदाब वाढत नाही तर संतुलित ठेवण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या रुग्णांना सैंधव मिठाचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण अशावेळी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेच आहे, त्यानंतरच सैंधव मिठाचं सेवन करा.