Health Tips : मधुमेहामध्ये 'ही' फळे हानिकारक असू शकतात; चुकूनही सेवन करू नका
मधुमेह ही एक गंभीर समस्या झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमधुमेहामध्ये काही फळे खाल्ल्यास साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.
फळांचा रस प्यायल्याने सामान्य व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी फळांचा रस पिणे टाळावे.
लिची हे रसाळ फळ आहे. यामध्ये सुमारे 16 ग्रॅम साखर असते. अशा स्थितीत मधुमेहामध्ये लिची खाणे टाळावे.
अननसमध्ये सुमारे 16 ग्रॅम साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी अननस देखील खाऊ नये.
काही फळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. 70 ते 100 च्या दरम्यान जीआय स्कोअर असलेल्या फळांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. केळी आणि टरबूज देखील याच श्रेणीत येतात. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी जास्त पिकलेली केळी आणि टरबूज खाऊ नये.
सफरचंदात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे मधुमेहींनी सफरचंद खाणे टाळावे.
जर कोणाला मधुमेहाचा त्रास असेल तर त्यांनी आंबा खाणे टाळावे, कारण आंब्याच्या एका सर्व्हिंगमध्ये 14 ग्रॅम साखर असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.