Dates Benefits : हिवाळ्यात खजूर खा; शरीराला मिळतील आश्चर्यकारक फायदे
जर तुम्हाला हिवाळ्यात हाय बीपी नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज खजूर खाणं गरजेचं आहे. खजूरमध्ये पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखजूर गोड असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे, कारण ते यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात अॅनिमियाची तक्रार करणारे अनेक लोक आहेत. असे लोक खजुराच्या मदतीने अॅनिमियावर मात करु शकतात.
खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळते, त्यात असलेले फायबर आणि व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आहेत जे शरीरात लोह शोषण्यास मदत करतात.
हिवाळ्यात स्नायू आणि हाडांचा त्रास होतो. लोक वेदनांनी त्रस्त होतात, अशा परिस्थितीत खजूर खावे कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियमचे भांडार आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास लोकांना होतो, ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहेत. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला टाळता येतो.
हिवाळ्यात अनेकदा बद्धकोष्ठतेच्या समस्येने लोक हैराण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो.
रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.