Health Tips : वजन कमी करण्याबरोबरच त्वचेसाठीही लिंबूपाणी गुणकारी!
सध्या पावसाळ्याचा ऋतू जरी सुरु असला तरी मात्र, घराबाहेर पडल्यावर प्रचंड उन्हाळा जाणवतो. अशा मध्ये शरीरात लवकर थकवा येतो. घाम होतो. अशा वेळी लिंबू पाणी तुमचा थकवा तर घालवतेच पण त्याचबरोबर लिंबाचे अजूनही बरेच फायदे आहेत. कोणते ते जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवृद्धत्वविरोधी : लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. ते तुमच्या त्वचेच्या दुरुस्तीचा वेग वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट राहते आणि चेहरा उजळतो.
निरोगी केस : लिंबूमध्ये हायड्रेशन तसेच तुरट गुणधर्म असतात. त्यामुळे ते केसांना आतून पोषण देते आणि त्यांची मुळे मजबूत करण्याचे काम करते.
मुरुमांपासून मुक्त त्वचा : लिंबू पाण्याचे नियमित सेवन केल्यास मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही मुरूमांनी त्रस्त असाल तर तुम्ही दररोज एक ग्लास लिंबू पाणी प्यावे.
पचन सुधारते : दररोज लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅस, आंबट ढेकर यासारख्या समस्या दूर राहतात. अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास होत असला तरीही, तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून त्याचे सेवन करू शकता.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : व्हिटॅमिन-सी आणि सायट्रिक ऍसिडमुळे, लिंबू रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते आणि ते तोंडाचे आरोग्य देखील सुधारते.
पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही जेवणानंतर लगेच अर्धा ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता. लक्षात ठेवा की पाणी कोमट असावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.