Swim During Pregnancy: गरोदरपणात स्विमिंग करणं कितपत सुरक्षित आणि किती फायदेशीर?
असाच एक प्रश्न म्हणजे, गरोदरपणात पोहणं सुरक्षित आहे की नाही? याबाबत आज जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरोदरपणात पोहणं सामान्यतः सुरक्षित आणि फायदेशीर असतं. पण, त्यादरम्यान, काही खबरदारीचे उपाय देखील सांगण्यात आले आहेत.
पोहणं कमी प्रभावाचा व्यायाम आहे, अनेकदा डॉक्टरांकडूनही गर्भधारणेदरम्यान पोहोण्याचा सल्लाही दिला जातो.
पोहोल्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे गरोदरपणात पोहोचणं अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानलं जातं.
पाण्यात पोहोण्याचे फायदे कित्येक पटींनी आहेत. गर्भवती महिलांना सक्रिय राहण्यास, त्यांच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासोबतच गरोदरपणातील अवघडलेल्या अवस्थेत त्यांना आराम देण्यास मदत करतात.
दरम्यान, आई आणि बाळ दोघांचीही सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काही सावधगिरी आणि मार्गदर्शक तत्त्व पाळली पाहिजेत.
पोहणं हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे, जो सांधे आणि स्नायूंवर सौम्य आहे. यामुळे हे गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे. हे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी फिटनेस, स्नायूंची ताकद आणि लवचिकता सुधारतं, परंतु शरीरावर जास्त ताण देत नाही.
पोहणे गरोदरपणात होणारे त्रास, जसं की पाठदुखी, सूज आणि थकवा दूर करतं.
पोहण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, पाय आणि घोट्यांवरील सूज कमी होण्यास मदत होते. पोहणं स्नायूंना लवचिक बनवतं आणि लॅक्टिक ऍसिड जमा होण्यापासून रोखतं. हे रात्रीच्या वेळी स्नायूंचे क्रॅम्प बऱ्याच प्रमाणात कमी करतं.