Health Tips : कोल्ड्रिंक्स पिल्याने होतात 'हे' आजार?
तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी कोल्ड्रिंक पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. (Photo Credit : pexel.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक जणांचा असा गैरसमज आहे की कोल्ड्रिंक पिल्याने अन्नपचनास मदत होते मात्र कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढून , येण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : pexel.com)
लहान मुलांच्याही आरोग्यासाठी कोल्ड्रिंक घातक असते तसेच लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं मुख्य कारण कोल्ड्रिंक्सही असू शकतं. (Photo Credit : pexel.com)
डाएट सोडाही शरीरासाठी घातक ठरु शकतो, त्यामुळे साखर खाण्याची इच्छा वाढते. गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. (Photo Credit : pexel.com)
कोल्ड्रिंक्स नियमित प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. अपचन, गॅसेस, मूळव्याध, जुलाब अशा प्रकारचे आजार कोल्ड्रिंक्समुळे होण्याची शक्यता असते. आतड्यांचे आरोग्य बिघडून त्याचे आजार होण्याची शक्यताही कोल्डड्रिंक्समुळे वाढते. (Photo Credit : pexel.com)
कोल्ड्रिंकमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे कॅन्सरसारखे आजार, मेंदूचे विकार, डोकेदुखी, थकवा, त्वचाविकार, थायरॉईड, हार्मोन्सचे विकार, वंध्यत्व येण्याची शक्यता असते. (Photo Credit : pexel.com)
कोल्ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफेनमुळे रक्तदाब वाढतो. शीतपेयांच्या नियमित सेवनाने शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊन शरीर कोरडं होतं. यासोबत किडनी, लिव्हर, हाडं, दाताचे विकार, ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : pexel.com)