Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Workplace Burnout : वर्कप्लेस बर्नआऊट ही भारतीयांमधील सर्वात सामान्य समस्या, जाणून घ्या याबद्दल सर्व काही !
आपण आपल्या कामात इतके गुंतलेले असतो की अनेकदा आपण आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे विसरतो. यामुळे अनेकदा लोकांना चिंता, तणाव इत्यादींना सामोरे जावे लागते, पण या सर्वांची सर्वात सामान्य आणि गंभीर समस्या म्हणजे बर्नआऊट.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबर्नआऊटची समस्या जास्त ताणामुळे होते. बर्नआऊट म्हणजे तणावामुळे व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेली असते. रिकाम्यापणाची आणि आपलं काम करण्यास असमर्थतेची भावना आहे. एका सर्व्हेनुसार बर्नआऊटची समस्या भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक दिसून येते.(Photo Credit : pexels )
मॅकिन्से हेल्थ इन्स्टिट्यूटने 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार 59 टक्के भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये बर्नआऊटची लक्षणे दिसून आली. (Photo Credit : pexels )
या सर्वेक्षणात 18 ते 24 वयोगटातील कर्मचारी, छोट्या कंपनीचे कर्मचारी आणि व्यवस्थापक पदाच्या खाली असलेल्या कामगारांमध्ये सर्वाधिक बर्नआऊट झाल्याचे आढळून आले. याचबरोबर कामाच्या ठिकाणी थकवा ही भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक दिसून आला.(Photo Credit : pexels )
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बर्नआउट हा एक सिंड्रोम आहे जो दीर्घकालीन कामाच्या ठिकाणी तणावामुळे होतो. कामाच्या ठिकाणी येणारा ताण योग्य प्रकारे हाताळला जात नाही, तेव्हा तो बर्नआऊटचे कारण ठरतो.(Photo Credit : pexels )
ही वैद्यकीय स्थिती नसली तरी यामुळे तुम्हाला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रदीर्घ ताणामुळे मानसिक थकवा येतो, जो हळूहळू शारीरिक थकवा म्हणून दिसून येतो.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )