Viral Fever : बदलत्या ऋतूत आपल्या मुलाला निरोगी ठेवायचे आहे, व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी करा 'हे' उपाय !
हवामानात झपाट्याने होत असलेल्या बदलामुळे लोकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास सहन करावा लागत आहे. तापमानातील चढउतारामुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपासून हवामानात सातत्याने होत असलेल्या चढ-उतारांमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. ज्यामुळे मुलांना सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल न्यूमोनियाचा त्रास होत आहे.(Photo Credit : pexels )
अलिकडच्या काळात रुग्णालयात येणाऱ्या सुमारे ४० टक्के रुग्णांमध्ये अशी समस्या दिसून येत आहे. ओपीडीमध्ये दररोज ५०० हून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. बहुतांश रुग्ण हंगामी आजारांच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.(Photo Credit : pexels )
ज्या पद्धतीने हवामान बदलत आहे, त्यामुळे सर्व वयोगटातील लोक हंगामी आजारांना बळी पडत आहेत.तापमानातील चढ-उतार हे मुख्य कारण आहे. दिवसा वाढता सूर्यप्रकाश आणि रात्री थंडी यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.खास करून लहान मुलांच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतांना दिसून येत आहे. (Photo Credit : pexels )
बदलत्या हवामानातील चढ-उतारांमुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव होत आहे. या ऋतूत मुलांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.(Photo Credit : pexels )
या ऋतूत मुलांच्या नाकातून पाणी येणे, श्वास लागणे, कफ आणि खोकला आणि झोपताना घरघराणे अशा तक्रारी सर्रास आढळतात. सुरुवातीच्या काळात योग्य उपचार न मिळाल्यास न्यूमोनियासह इतर गंभीर आजार होऊ शकतात.(Photo Credit : pexels )
बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. प्रौढांपेक्षा मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे ते विविध प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना सहज बळी पडतात.(Photo Credit : pexels )
या बदलत्या हवामानात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. विशेषत: लहान मुले आणि वृद्धांच्या बाबतीत हे महत्वाचे आहे. अशा हवामानात शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या पदार्थांच्या सेवनाला प्राधान्य दिले पाहिजे.(Photo Credit : pexels )
हिरव्या पालेभाज्या, आवळ्यासह हंगामी फळांचे अधिक सेवन करा. ताजे अन्न आणि हलके कोमट पाणी प्या, ज्यामुळे संसर्गाची शक्यता कमी होते. उन्हातून आल्यानंतर जास्त थंड पाणी पिणे टाळावे. स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. अधिक त्रास झाल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक आहे.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )