Hair Care Tips : अशा प्रकारे केसांमध्ये ग्लिसरीनचा वापर करा, केसांची चमक आणि ताकद वाढेल !
जसजसे हवामान बदलते तसतसे त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या सुरू होतात. जवळजवळ प्रत्येक ऋतूत केस गळण्याच्या समस्येने लोक त्रस्त असतात. या ऋतूत कोरडेपणामुळे केस लवकर तुटतात. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा वेळी त्यांना हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यासाठी शॅम्पूनंतर कंडिशनरचा वापर करा. तसे तर , ग्लिसरीनचा वापर केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठीदेखील खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याचा वापर कसा करायचा. (Photo Credit : pexels )
यासाठी केसांच्या लांबीनुसार ग्लिसरीन आणि पाणी समप्रमाणात घालावे.नंतर त्यात गुलाबपाण्याचे काही थेंब घालावे. तसेच काही प्रमाणात आवश्यक तेल.हे केसांना लावा.15 मिनिटांनी शॅम्पू.यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो. (Photo Credit : pexels )
यासाठी मध आणि ग्लिसरीन समान प्रमाणात घ्यावे लागते.त्यात 1ते 2 चमचे खोबरेल तेल घालावे.चांगले मिक्स करून केसांना लावा.त्यानंतर 30 केस पाण्याने धून घ्यावे . (Photo Credit : pexels )
कोरफड जेलमुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.एका बाऊलमध्ये ग्लिसरीन आणि कोरफड जेल समप्रमाणात बारीक करून चांगले किसून घ्यावे. हे केसांना लावा.हे लावल्याने केस तुटणे आणि गळणे थांबते.(Photo Credit : pexels )
2 चमचे एवोकॅडो पल्पमध्ये समान प्रमाणात ग्लिसरीन मिसळा.आता त्यात ऑलिव्ह ऑईल घाला.केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत लावा. त्यानंतर 15 मिनिटांनी गरम पाण्याने केस धून काढावे .यामुळे केसांची चमक आणि ताकद वाढते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )