Skin Texture : ही फळे त्वचेचा पोत सुधारण्यास आणि त्वचा निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत !
निरोगी आणि संतुलित आहाराचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावरच दिसून येत नाही, तर यामुळे त्वचा दीर्घकाळ चमकदार आणि तरुण राहते. वाढत्या वयाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं सर्वात गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने त्वचेचा पोत सुधारला जाऊ शकतो तसेच रंगही सुधारता येऊ शकतो. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण आपल्या स्किनकेअरमध्ये लिंबूवर्गीय फळांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये असलेले जीवनसत्त्व सी त्वचेसाठी वरदान आहे. (Photo Credit : pexels )
बेरी, द्राक्षे आणि डाळिंब यासारखी फळे अँटीऑक्सिडंट्सचा खजिना आहेत, ते शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात आणि म्हातारपणातही आपल्याला तरुण ठेवतात. (Photo Credit : pexels )
पपईच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. त्यामुळे पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.(Photo Credit : pexels )
केळीमध्ये जीवनसत्त्व ए, बी आणि ई भरपूर प्रमाणात असते. खाणे आणि लावणे दोन्ही फायदेशीर ठरतात. पिकलेली केळी चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या दूर होतात. चेहऱ्याची चमकही वाढते.(Photo Credit : pexels )
चेहऱ्याचा लालसरपणा वाढवायचा असेल तर डाळिंबाचा आहारात समावेश करा. यामुळे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण होण्यास मदत होते. यात अनेक आवश्यक पोषक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा स्वच्छ करण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करतात.(Photo Credit : pexels )
लिंबातील जीवनसत्त्व सीचे प्रमाण त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या, त्याचा परिणाम काही आठवड्यांत दिसेल. लिंबाची साल कोपरावर चोळल्याने त्याचा काळापणा दूर होतो. लिंबामध्ये थोड्या प्रमाणात मध मिसळून त्याद्वारे चेहरा, कोपर आणि गुडघ्यांना मसाज करा. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )