Healthtips: रात्रभर झोप येत नाही? होऊ शकतात 'हे' आजार!
डॉक्टर म्हणतात की झोपेशी संबंधित समस्या जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतात. निरोगी व्यक्तीने 24 तासांत किमान 6-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.जर तुम्हालाही झोप न येण्याची समस्या असेल तर ती गांभीर्याने घेतली पाहिजे. [Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुतांश जण तणावपूर्ण जीवन जगत असतात त्यांना अनेक प्रकारच्या मानसिक समस्याही होत्या. डॉक्टरांच्या मते, झोपेच्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक नकारात्मक आणि गंभीर परिणाम होतात.[Photo Credit:Pexel.com]
झोपेवर परिणाम होण्याची कारणे कोणती?तणाव आणि नैराश्य, मानसिक आरोग्य ही निद्रानाशाची सर्वात मोठी कारणे आहेत.[Photo Credit:Pexel.com]
जीवनशैली आणि नकारात्मक वातावरणामुळे अशा समस्या उद्भवतात, ज्यामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते, असे अनेक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे झोपेचा त्रास होतो.[Photo Credit:Pexel.com]
पचनाच्या समस्या: ज्या लोकांना पोटाच्या समस्या किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांना कमी झोप लागते. पचनाच्या समस्यांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो, त्यामुळे रात्री लवकर झोप येत नाही.[Photo Credit:Pexel.com]
एवढेच नाही तर तुमची झोप जितकी खराब असेल तितकी पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे झोपेच्या समस्या हलक्यात घेऊ नये.[Photo Credit:Pexel.com]
न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल आरोग्य समस्या वेगाने वाढत आहेत, अशा समस्यांमुळे झोपेवरही परिणाम होतो.[Photo Credit:Pexel.com]
स्लीप एपनिया, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, निद्रानाश आणि पॅरासोम्निया यांसारख्या न्यूरोलॉजिकल परिस्थिती झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतात. यासोबतच न्यूरोलॉजिकल विकारांमुळे जीवनमानावरही परिणाम होतो.[Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit:Pexel.com]