Papaya Side Effects : या लोकांसाठी पपई ठरेल आरोग्यासाठी घातक
पपई हे वर्षभर मिळणारे फळ आहे. हे रसाळ आणि चवीने परिपूर्ण आहे. पिवळ्या, पिकलेल्या पपईमध्ये भरपूर पोषक असतात. मधुमेह, हृदय आणि कर्करोगाच्या आजारांमध्ये पपई शरीरासाठी चांगली मानली जाते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाऊ नये: किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी पपई खाऊ नये: ज्या लोकांना किडनीचा आजार आहे किंवा किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी पपई खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
पपईमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही स्टोनचे रुग्ण असाल आणि पपई खाल्ल्यास तुमची समस्या वाढू शकते. पपई खाल्ल्याने ऑक्सलेटची समस्या वाढू शकते. [Photo Credit : Pexel.com]
हृदयाचे ठोके संबंधित समस्या : पपई हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यास खूप मदत करते. ज्यांचे हृदयाचे ठोके जलद किंवा मंद असतात त्यांनी पपई खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
पपईमध्ये सायनोजेनिक ग्लायकोसाइड आढळते. जे अमिनो ॲसिडसारखे असते. यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
गरोदरपणात खाऊ नका: पपईमध्ये लेटेक्स असते. त्यामुळे गरोदर महिलांनी पपई खाऊ नये. यामुळे प्री-डिलीव्हरी होण्याचा धोका वाढतो. [Photo Credit : Pexel.com]
पपईमध्ये पपेन असते जे शरीरातील प्रोस्टॅग्लँडिनमुळे कृत्रिमरित्या प्रसूती वेदना सुरू करू शकते.[Photo Credit : Pexel.com]
ऍलर्जीने त्रस्त लोक: ऍलर्जीचा त्रास असलेल्या लोकांनी पपई खाऊ नये. लेटेक्स सह क्रॉस प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]