Pistachios : या लोकांनी पिस्ता खाताना करावा विचार ? जाणून घ्या तुम्ही देखील यात नाही ना !
पिस्ता खूप चवदार असतात.खारट चवीमुळे लोकांना ते खायला खूप आवडते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6,फायबर, कॅल्शियम, लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही लोकांनी पिस्ता खाऊ नये? दररोज पिस्ते खाणाऱ्या व्यक्तीला दिवसभर उत्साही वाटते. पिस्ता खाल्ल्याने शरीरातील थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. पिस्ते खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही लोकांसाठी पिस्ता अजिबात चांगला नाही. [Photo Credit : Pexel.com]
याच कारणामुळे अनेकांना पिस्ता खाण्यास पूर्णपणे मनाई आहे.चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पिस्ता अजिबात खाऊ नये.[Photo Credit : Pexel.com]
पिस्ता कोणी खाऊ नये? ऍलर्जी रुग्ण : पिस्त्याचा स्वभाव उष्ण असतो. अशा परिस्थितीत ज्यांना नट आणि ऍलर्जीमुळे शरीरात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल त्यांनी चुकूनही पिस्ता खाऊ नये. त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी संबंधित समस्या नसेल तर तुम्ही पिस्ता जरूर खा.[Photo Credit : Pexel.com]
किडनीचे रुग्ण : तुम्हाला किडनी स्टोन असेल तर पिस्ता अजिबात खाऊ नये. पिस्त्यात भरपूर प्रमाणात ऑक्सलेट असते ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी पिस्ता खाऊ नये. [Photo Credit : Pexel.com]
वजन कमी करणे : ज्यांना पटकन वजन कमी करायचे आहे त्यांनी पिस्ता खाऊ नये. पिस्ते जास्त खाल्ल्याने कॅलरीज वाढते. त्यामुळे लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढू शकतो. [Photo Credit : Pexel.com]
पचनाच्या समस्या : ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी पिस्ता खाऊ नये. उन्हाळ्यात पिस्ते कमी खावेत कारण त्याचा बेस गरम असतो.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]