Pomegranate Benifits : स्किनकेअरमध्ये डाळिंबाचा या प्रकारे करा समावेश, डागांसह टॅनिंगही दूर होईल !
अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध डाळिंब केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. आपल्या ब्युटी केअरचा एक भाग बनवून तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफेसपॅकमध्ये डाळिंबाचा वापर केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारतो, गुलाबी चमक मिळते, त्वचा मऊ होते आणि टॅनिंगपासूनही मुक्ती मिळते. डाळिंबाचा नियमित वापर केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे काही आठवड्यांत दिसतील, तर चला जाणून घेऊया त्याचा वापर कसा करावा.(Photo Credit : pexels )
1 चमचा डाळिंबाचा रस, 1 चिमूटभर हळद एका बाऊलमध्ये दोन्ही साहित्य एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर तसेच मानेवर लावावे. सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतात.(Photo Credit : pexels )
1 चमचा एवोकॅडो पेस्ट, 1 टेबलस्पून डाळिंबाचा रस प्रथम बाऊलमध्ये दोन्ही साहित्य चांगले मिक्स करा. चेहऱ्यावर लावा आणि कमीत कमी १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर धुवून टाका.या फेसपॅकमुळे त्वचा निरोगी राहते.(Photo Credit : pexels )
कोरफड फेस पॅक - 1 चमचा डाळिंबाचा रस, 1चमचा फ्रेश कोरफड जेल बाऊलमध्ये दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा.15-20 मिनिटे ठेवा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा फेसपॅक त्वचा हायड्रेटेड ठेवतो.(Photo Credit : pexels )
1चमचा ओटमील पावडर, 2चमचे डाळिंबाचा रसएका बाऊलमध्ये दोन्ही साहित्य मिक्स करून पेस्ट तयार करा. चेहरा आणि मान या दोन्ही ठिकाणी लावा. 10 मिनिटे स्वच्छ धुवून चेहरा धुवावा. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हा फेसपॅक खूप प्रभावी आहे.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )