Tips for Thick Eyebrows : नैसर्गिक पध्दतीने काळ्या आणि दाट भुवया मिळवायच्या असतील तर हे घरगुती उपाय करून पहाचं !
चेहऱ्याच्या सौंदर्यात कशाचीही कमतरता असेल तर काहीतरी अपूर्ण वाटते आणि मग आपले डोळे सुंदर असतील तर सौंदर्यात भर घालतात. अशा वेळी आपल्या भुवया आणि डोळ्यांच्या पापण्या हलक्या किंवा खूप कमी असताना आपल्या डोळ्यांच्या सौंदर्यात घट होणे साहजिक आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही स्त्रिया थ्रेडिंगमुळे भुवया आणि पापण्यांचे केस गमावतात किंवा काहींचे जन्माच्या वेळी केस कमी असतात. अशावेळी ते पेन्सिलने त्यांना गडद करतात, पण कधी कधी ते अतिशय अनैसर्गिक दिसू लागते आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्याऐवजी बिघडते. त्यांना काळे, दाट बनवण्यासाठी काही घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊया-(Photo Credit : pexels )
कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना नैसर्गिकरित्या पोषण देते आणि लांब काळे, दाट बनवते. त्यामुळे त्याचा रस कापसाच्या गोळ्यात घालून आपल्या भुवयावर लावावा. दोन आठवड्यांत तुम्हाला फरक जाणवेल.(Photo Credit : pexels )
कच्च्या कोरफडीतून जेल काढून कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने आपल्या भुवया आणि डोळ्यांच्या पापण्यांवर लावा. सुमारे एक तास ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आपल्या पापण्या आणि भुवया खूप लवकर गडद आणि दाट होतील.(Photo Credit : pexels )
कापसाच्या बोळ्याच्या साहाय्याने हलक्या हाताने कच्च्या दुधाने पापण्या आणि भुवया चोळा. 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका.(Photo Credit : pexels )
ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट पापण्या आणि भुवयांना भरपूर पोषण देऊन त्यांच्या विकासास मदत करते, म्हणून ते बनवल्यानंतर कॉटन बॉलच्या मदतीने लावा.(Photo Credit : pexels )
पेट्रोलियम जेली दररोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रशच्या साहाय्याने आपल्या भुवया आणि पापण्यांवर लावा. यामुळे ते लवकरच जाड आणि काळे होतील.(Photo Credit : pexels )
कैस्टर ऑयल यामध्ये असलेले रिसिनोलिक अॅसिड, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी हे गुणधर्म केसांच्या वाढीस मदत करतात, त्यामुळे नक्की ट्राय करा.(Photo Credit : pexels )
मेथीदाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून पेस्ट तयार करून आपल्या भुवया आणि पापण्यांवर मास्कप्रमाणे लावा आणि नंतर 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. त्याचे परिणाम तुम्हाला काही दिवसांतच दिसतील.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )