Beauty Tips : चेहऱ्यावरील डाग दूर होत नसतील तर लेमनग्रासपासून बनवलेले हे फेसपॅक ट्राय करून बघा!
लेमनग्रास दिसायला अगदी सामान्य गवतासारखा दिसतो, पण त्याची चव आणि सुगंध त्याला वेगळं बनवतो. शिवाय हे गवत अनेक औषधी गुणधर्मांनी ही समृद्ध आहे. यामुळे जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. (Photo Credit : pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच लेमनग्रास आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे का? यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवतात. चेहरा उजळवण्यासाठी आपण आपल्या स्किनकेअरमध्ये याचा समावेश करू शकता. (Photo Credit : pexels)
एका बाऊलमध्ये 1 चमचा लेमनग्रास पावडर, 1/2 चमचा मध आणि 1/2 चमचा गुलाबजल मिसळा.हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे ठेवा.त्वरीत परिणामांसाठी आठवड्यातून एकदा हे लागू करा. (Photo Credit : pexels)
एका बाऊलमध्ये 1 चमचा लेमनग्रास पावडर आणि 1 चमचा कोरफड जेल घेऊन चांगले मिक्स करावे.चेहऱ्यावर लावा आणि 1/2 तास ठेवा.आठवड्यातून एकदा हा फेसपॅक लावा. (Photo Credit : pexels)
एका बाऊलमध्ये 1 चमचा मुलतानी माती पावडर, 1 चमचा लेमनग्रास पावडर आणि 1 चमचा गुलाबजल घेऊन जाड पेस्ट तयार करा.हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा.दर 10 दिवसांनी लावा. त्वचेची चमक वाढेल तसेच डागही कमी होतील. (Photo Credit : pexels)
लेमनग्रास आणि नारळाचे दूध एकत्र करून पेस्ट तयार करा.हे चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे ठेवा.त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल. (Photo Credit : pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)