Healthnews :उन्हाळ्यात डिहायड्रेशन मुळे होणारे 'हे' आजार ! तुम्हाला माहित आहेत का ?
उन्हाळ्यात पुढील आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.अति उष्णतेमुळे लोकांना अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.त्या समस्या जाणून घ्या ... [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउदाहरणार्थ, डिहायड्रेशन, उष्माघात, विषाणूजन्य ताप, यूटीआय, अतिसार, मायग्रेन, किडनी स्टोन, डोळ्यांचा संसर्ग आणि पोटात संसर्ग होण्याचा धोका लक्षणीय वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
शरीरात पाण्याची कमतरता हे डिहायड्रेशनचे सर्वात मोठे कारण आहे त्यामुळे आरोग्यालाही मोठा फटका बसतो.शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे खूप थकवा येतो, उच्च रक्तदाब आणि साखरेची पातळी प्रभावित होते.अशा परिस्थितीत,लोकांनी दररोज 3-4 लिटर पाणी प्यावे जेणेकरून ते स्वतःला हायड्रेट ठेवतील. [Photo Credit : Pexel.com]
उन्हाळ्यात किडनी स्टोनचे प्रमाण झपाट्याने वाढते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाण्याची कमतरता, शौचास जळजळ होणे, रक्तस्त्राव होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, पोटदुखी, पाठदुखी आणि वारंवार शौचास त्रास होऊ शकतो. [Photo Credit : Pexel.com]
जर एखाद्याला उन्हाळ्यात खूप घाम येत असेल किंवा उलट्या होत असतील तरअस्वस्थता, मळमळ, चक्कर येणे, उष्माघाताची लक्षणे दिसतात.[Photo Credit : Pexel.com]
तापासारखी लक्षणेही शरीरावर दिसू शकतात.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,उन्हाळ्यात टायफॉइड, कावीळ तसेच गॅससारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. [Photo Credit : Pexel.com]
बहुतेक महिलांना उन्हाळ्यात UTI आणि अनियमित मासिक पाळी यांसह अनेक समस्या येऊ शकतात .विशेषतः महिलांनी उन्हाळ्यात काही खबरदारी पाळणे आवश्यक आहे. [Photo Credit : Pexel.com]
लोकांनी उन्हाळ्यात जास्त काळ उघडे आणि उरलेले अन्न खाणे टाळावे.असे केल्याने रोग होत नाहीत. [Photo Credit : Pexel.com]
उन्हाळ्यात बाहेरचे खाणे असो किंवा फळांच्या रसामध्ये वापरण्यात येणारा बर्फ तो हि आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. विशेषतः हे ज्यूस पिणे टाळावे. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]