Skin Benefits of Fennel Seeds : बडीशेप कायम ठेवते चेहऱ्याची चमक, या फेसपॅकच्या मदतीने मिळवा चमकदार त्वचा !
आपण बडीशेप माउथ फ्रेशनर म्हणून वापरत असलो तरी लोणचे मसाले, व्हेजिटेबल टेम्परिंग आणि गुजराती कढी, बिहारमधील गोड खजूर आणि असे अनेक पदार्थ यासह त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत. बडीशेप मध्ये औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असलेले कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. एकीकडे हे शरीराच्या पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे, तर दुसरीकडे त्याच्या वापराने आपल्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअँटी-कार्सिनोजेनिक, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध बडीशेप त्वचेशी संबंधित समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करते. इतकंच नाही तर त्यापासून बनवलेला फेस मास्क आणि बडीशेपपासून बनवलेली वाफ यामुळे चेहऱ्याला अंतर्गत पोषण मिळतं, ज्यामुळे चेहरा उजळतो . बडीशेप आणि त्यापासून बनवलेल्या फेस मास्कचे फायदे जाणून घेऊया -(Photo Credit : pexels )
बडीशेपमध्ये आवश्यक तेल समृद्ध आहे, जे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध बडीशेप श्वासाची दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )
तसेच बडीशेपमध्ये अॅनेटहोल कंपाऊंड आढळते, ज्यात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. यकृताचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग टाळण्यास मदत होते.बडीशेपमध्ये असलेले तेल आणि फायबर आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते.(Photo Credit : pexels )
बडीशेपमध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास आणि चयापचय वाढविण्यास मदत करते. तसेच यामुळे कॅलरीज खूप लवकर बर्न होतात.(Photo Credit : pexels )
पाणी गरम होण्यासाठी ठेवा आणि एक चमचा बडीशेप घालून उकळा आणि नंतर गॅस बंद करून वाफ घ्या. यामुळे चेहऱ्यावर साचलेली धूळ साफ होते.(Photo Credit : pexels )
एका मोठ्या भांड्यात अर्धा लिटर पाणी टाकून उकळून त्यात मूठभर बडीशेप घालून चांगले उकळल्यावर फिल्टर करावे. आता त्यात बडीशेप तेल घालून स्प्रे बाटलीत भरून टोनर म्हणून वापरा.(Photo Credit : pexels )
2 चमचे ओटमील पावडरमध्ये एक चमचा बडीशेप बारीक करून मग त्यात थोडे दूध आणि अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करावी. आता ते चेहऱ्यावर लावा आणि तासाभरानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )